Wednesday, 6 March 2019

आंबेडकरी  समाजाचा तीन तगाडा, काम बिघाडा !

तसे म्हटले तर आंबेडकरी समाजाचे काम खूप आधी पासूनच बिघडलेले आहे . गट तट, गुणवत्ता हीन नेतृत्व , आपलकोंडी पणा , अत्यल्प समाज असूनही मोठा आव आणणे , हिंदू समाजावर विनाकारण टीका , ब्राह्मण चांगला , ब्राह्मिणीसम वाईट असा तर्क हीन विचार . ब्राह्मण धर्म आणि हिंदू धर्म एकच असा मूर्खा सारखा युक्तिवाद या मुळे हा अर्धा - एक टक्का बौद्ध धर्मांतरीत पुर्वश्रमीचा दलित ,वंचित ,बहिष्क्रुत , अस्पृश्य म्हणून विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मी ब्राह्मीनानी हिणविलेला समाज खरे म्हणजे ज्याला जास्त चांगल्या संघटनेची गरज आहे तो राहून राहून तुटतो , विखंडित होतो त्या समाजात ज्याला आज आंबेडकरी - रिपब्लिकन समाज म्हटला जातो तिथे  असा तीन तीगाडा आणि काम बिघाडा बघितले कि या समाज बद्धल वाईट वाटते !

खरे म्हणजे वर्ष २०१९ चे वर्ष या समाजाला संघटित होनाचे सुवर्ण वर्ष होते , समाजाला ते पाहिजे होते ,समाज आरएसएस , बीजेपी - मोदी राज च्या ५ वर्ष्याच्या अनेक समाज , राष्ट्र , संविधान , आरक्षण , अब्रू , नौकरी , रोजगार, शिक्षण , कायदे व सुरक्षा आदी विविध प्रश्न या समाजालाच जास्त त्रास दायक ठरले होते आणि त्या भयंकर अवस्थतून हा समाज गेला आणि शहाणा होईल असा समज  झाला पण तसे न होता हा समाज अजून अधिकाधिक विखयरला गेला आहे .

काँग्रेस - राष्ट्रवादी बरोबर असलेले नेते तिथेच आहेत , बीजेपी बरोबर असलेले नेते तिथेच आहेत . शंभर - दोनशे गट आहेत तसेच आहेत , वरून नवीन नवीन आघाड्या तयार होत आहेत त्या सुद्धा रिपब्लिकन गट . वंचित आघाडी , गणराज्य आघाडी , बहुजन आघाडी ! अर्धा - एक टक्का समाजची हि केवढी सर्कस !

आम्ही सर्व रिपब्लिकन गट , बहुजन गट , दलित आंबेडकरी गट एकत्र यावे म्हणून नेटिव्ह -वंचित - रिपब्लिकन फ्रंट बनवा असे सांगितले होते , त्या मध्ये वंचित चे १२ बीएसपी चे २४ आणि नेटिव्ह चे १२ असा फार्मुला दिला होता . सर्व असंतुष्टना नेटिव्ह चे १२ आम्ही देऊ म्हटले होते आणि आम्ही नेटिव्ह पीपल्स पार्टी चे १२ याच असंतुष्ट रिपब्लिकन गटांना देऊन रिपब्लिकन - आंबेडकरी जनते ची ऐक्य घडवून आणणार होतो पण अडेलतट्टू प्रकाश , मायावती , आठवले , कवाडे , माने , गवई , सुनील खोब्रागडे , शाम गायकवाड , शाम तागडे ,नाना इंदिसे , शिनगारे आदी कोणीही दाद दिली नाही . आम्ही अनेकदा फोने नंबर सह आवाहन केले पण काही उपयोग झाला नाही उलट आम्हालाच शेकडो लोकांनी शिव्या शाप दिल्या . असो त्याचे आम्हाला वाईट वाटत नाही , वाईट वाटते ते याचेच कि २०१९ च्या अत्यंत  वाईट परिस्थितीतही आंबेडकरी - रिपब्लिकन समाज एक हो होऊ शकत नाही !

नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट हि गैर ब्राह्मण चळवळ आहे त्या मुले रिपब्लिकन - आंबेडकरी पक्ष हे गैर ब्राह्मण पक्ष आहेत असा आमचा समज झाला होतो . हा समाज ब्राह्मीनवादी आहे अशी आमची खात्री झाली आहे आणि आंबेडकरी विचार ब्राह्मण विरोधी नाही तर ब्राह्मण आरएसएस , बीजेपी , काँग्रेस आदी मनुवादी प्रवृत्तीने  ग्रासलेला आहे हे स्पस्ट झाले आहे . तेव्हा आम्ही नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व ला मानणारे याना आता राम  राम करतो !

विदेशी वैदिक धर्मी ब्राह्मण आणि त्यांचा ब्राह्मीनवादी विचार तुम्हाला मुबारक असो ! आमचा लढा विदेशी ब्राहमिन भागावो ,नेटिव्ह रुल लावो , या कामाचे तुम्ही नाहीत !

नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
#नेटीव्हीसम

No comments:

Post a Comment